• Wed. Apr 23rd, 2025

काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून निषेध

ByMirror

Apr 23, 2025

भिंगारमध्ये शोक सभा घेवून बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली; शांतता भंग करणाऱ्या शक्तींना ठोस उत्तर देण्याची मागणी

दहशतवाद्यांना आता ठोस उत्तर देण्याची गरज -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- काश्‍मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या हल्ल्यात बळी पडलेल्या 28 निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


या शोकसभेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, रमेश वराडे, रतनशेठ मेहेत्रे, मेजर दिलीपराव ठोकळ, दिपकराव धाडगे, जहीर सय्यद, सुधीरशेठ कपाळे, अशोकराव पराते, विलासराव आहेर, सर्वेश सपकाळ, दीपकराव घोडके, अभिजीत सपकाळ, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, दिलीपशेठ गुगळे, प्रकाश देवळालीकर, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, कुमार धतुरे, योगेश चौधरी, मुन्ना वागस्कर, दशरथराव मुंडे, नामदेवराव जावळे, अमोल सकपाळ, संतोष वीर, अनिल शिरसाठ, पंडितजी आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, काश्‍मीरमध्ये सातत्याने अशांतता माजवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून भारताची एकता, शांतता आणि अखंडतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहे. धर्माच्या नावावर निरपराध नागरिकांवर हल्ला करणे हे केवळ कायरतेचे लक्षण आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्र सरकारने अशा हल्ल्यांमागील शक्तींना शोधून काढून कठोर शासन करण्याची मागणी केली.


सभेत सर्वांनी एकमताने हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांवर व त्यांना पाठबळ देणाऱ्या शत्रू राष्ट्रांवर कारवाईची मागणी केली. दहशतवाद्यांचा हेतू म्हणजे भीती निर्माण करून समाजात अस्थिरता पसरवणे. मात्र, भारतवासीय एकदिलाने याला प्रत्युत्तर देतील, असा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला. तर सभेच्या अखेरीस उपस्थित सर्वांनी मौन पाळून हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *