• Thu. Jan 29th, 2026

महापुरुषांच्या विचारांचा जागर करत हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून संयुक्त जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Apr 15, 2025

फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन -संजय सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर जॉगिंग पार्कमध्ये लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करुन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व सचिनशेठ चोपडा यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. धम्ममित्र संजय भिंगारदिवे व विकास भिंगारदिवे यांनी भगवान गौतम बुध्दांच्या पुतळ्यासमोर त्रीशरण व पंचशील घेतले. याप्रसंगी सीए रवींद्र कटारिया, सर्वेश सपकाळ, दीपक धाडगे, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, दिलीपराव ठोकळ, किरण फुलारी, रतनशेठ मेहेत्रे, सुधीरशेठ कपाळे, ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, अशोक पराते, अविनाश जाधव, विलास आहेर, दीपकराव घोडके, विठ्ठल (नाना) राहिंज, रमेशराव त्रिमुखे, अशोक लोंढे, शिरीष पोटे, प्रकाश देवळालीकर, दीपकराव बडदे, शेषराव पालवे, कुमार धतुरे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, संतोष लुनिया, विशाल बोगावत, सुधाकर झांबरे, दिनेश शहापूरकर, जालिंदर अळकुटे, अजय खंडागळे, विकास निमसे, सत्यजीत कस्तुरे, योगेश चौधरी, फैय्याज खान, शशिकांत पवार, बाळासाहेब झिंजे, अष्टांग आचारी, योगेश हळगावकर, अतुल वराडे, दीपक बोंदर्डे, धनेश पंधारे, दशरथराव मुंडे, अनुश्री झिंजे, विशाल भामरे, प्रशांत चोपडा आदी उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, शेवटच्या व्यक्तीचा विकास साधणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे त्यांनी सांगितले.


सचिनशेठ चोपडा यांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही गुरु-शिष्यांनी समाजाच्या उध्दारासाठी शिक्षणाचा मंत्र देवून समतेची रुजवण केली. आजही त्यांच्या विचारात समाजाला नवसंजीवनी देण्याचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रमेश त्रिमुखे व ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी फुले-आंबेडकर यांची समाजसुधारणेतील भूमिका समजावून सांगत नव्या पिढीला प्रेरक संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *