भगवान गौतम बुद्ध चरणी मेणबत्त्या प्रज्वलीत
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा हातात तिरंगा घेऊन शंखनाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- रोमांचक क्षणी पोहचलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा विजय होण्यासाठी भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी रोकडेश्वर हनुमान मंदिरात शनिवारी (दि.18 नोव्हेंबर) पहाटे हनुमान चाळीसा पठण करुन महाआरती केली. तर जॉगिंग पार्क मधील भगवान गौतम बुद्ध चरणी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन विजयासाठी प्रार्थना करण्यात आली.
पूजेनंतर हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय…, वंदे मातरम… जीतेंगा भाई जीतेंगा भारत जीतेंगाच्या घोषणानी परिसर दणाणून निघाला.

भारताच्या विजयासाठी परिसरातून हातात तिरंगे ध्वज घेऊन प्रभातफेरी देखील काढण्यात आली. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, बापूसाहेब तांबे, सर्वेश सपकाळ, संजय वाकचौरे, अभिजीत सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अविनाश जाधव, प्रवीण दुराफे, सुमेश केदारे, सचिन चोपडा, विठ्ठल राहिंज, राजू कांबळे, शंकरराव पंगुडवाले, सरदारसिंग परदेशी, अशोक पराते, अशोक लोंढे, विलास तोतरे, दिलीप गुगळे, धनंजय नामदे, राधेश्याम ठाकूर, राजदेव दीक्षित, पंढरीनाथ बनकर, विनोद यादव, सुधीर तेलंगे, अमोल धाडगे, दिलीप बोंदर्डे, नामदेवराव जावळे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, पार्वती रासकर, वनिता दळे, राजश्री राहिंज, निर्मला जाधव, रंजना झिंजे, निर्मला पांढरे, मालंदा हिंगणे, रिता दीक्षित, कृष्णा साठे, महेश सरोदे, आनंद सदलापूर, कुमार धतुरे, मच्छिंद्र बेरड, राजू शेख, जालिंदर बेरड, शरद धाडगे, भाऊसाहेब गुंजाळ, सिद्धू तात्या बेरड, बबनराव चिंचिणे, छगन लंगोटे, सुनील झोडगे, दिपक टाक, सुदर्शन भिंगारदिवे, सुनिल थोरात, दत्तात्रय बोरबणे, ॲड. भाऊसाहेब पल्लोड, डॉ. विजय भंडारी, जाहीर सय्यद, विशाल भामरे आदी उपस्थित होते.

रविवारी (दि.19 नोव्हेंबर) क्रिकेटच्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा संघ भिडणार आहे. 2003 नंतर दुसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वविजेते पदासाठी लढत रंगणार आहे.

अनेक संघांना संघांना चारीमुंड्या करत भारतीय संघाने दिमाखात विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवून विश्वचषक जिंकावा यासाठी हनुमान चरणी व भगवान गौतम बुध्दांकडे प्रार्थना करण्यात आली. पूजेदरम्यान, क्रिकेटप्रेमी हातात तिरंगा घेऊन आणि शंखनाद करताना दिसले.
संजय सपकाळ म्हणाले की, यावर्षी भारताने आक्रमक खेळी करुन सर्वांची मने जिंकली आहे. उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या जीवावर भारताचे पारडे जड आहे. सर्व भारतीयांची विश्चचषक जिंकण्याची मनापासून इच्छा आहे. भारत हा सामना भरघोस यशाने जिंको अशी देवाला प्रार्थना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
