उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला वकील महत्त्वाची भूमिका बजावत आहे -ॲड. अनुराधा येवले
विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या महिला वकीलांचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- न्यायालयात मोठ्या संख्येने असलेल्या महिला वकील कामात एवढ्या व्यस्त असतात की, एकमेकींची भेट घेऊन चर्चा देखील घडत नाही. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वकील एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करत आहे. न्यायिक क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे कार्य करीत असून, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास चौदा वर्ष झाले असून, महिला वकीलांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याचे त्यांनी प्रतिपादन ॲड. अनुराधा येवले यांनी
अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात महिला वकीलांचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा येवले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात न्यायालयातील सर्व महिला वकील सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी वकील संघाच्या महिला सचिव ॲड. जयाताई पाटोळे, ॲड. निर्मला चौधरी, ॲड. ज्योती हिमणे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. स्वाती नगरकर, ॲड. मनीषा केळगंद्रे, ॲड. स्वाती पाटील, ॲड. कुंदा दांगट, ॲड. शिल्पा बेरड, ॲड. अनुजा काटे, ॲड. शारदा लगड, ॲड. लता गांधी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नवनियुक्त नोटरी झालेल्या व सरकारी वकिलपदी नेमणुक झालेल्या महिला वकील यांचा सन्मान करण्यात आला. फॉरेन्सिक मेडिकल ऑफिसर म्हणून ॲड. शाहिसता सय्यद यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर वकील संघाच्या नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व महिलांना तिळगुळ देऊन वाण देण्यात आले. या हळदी-कुंकू कार्यक्रमाचे हे चौदावे वर्ष होते. कार्यक्रमात महिलांनी एकजुटीने एकत्र येवून विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी ॲड. प्रिया खरात, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. पल्लवी होनराव, ॲड. अर्चना राऊत, ॲड. रुपाली पठारे, ॲड. रत्ना दळवी, ॲड. दिपाली झांबरे, ॲड. मीनाक्षी कराळे, ॲड. सविता साठे, ॲड. कोमल दळवी, ॲड. करुणा शिंदे, ॲड. मीना भालेकर, ॲड. निरुपमा काकडे, ॲड. रिझवाना शेख, ॲड. मुबिना जहागीरदार, ॲड. यास्मिन शेख, ॲड. निलोफर शेख, ॲड. सुविद्या तांबोळी, ॲड. विमल खेडकर, ॲड. आशा गोंधळे, ॲड. मीना शुक्रे, ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. स्वाती जाधव, ॲड. जोसना ससाणे, ॲड. स्नेहा लोखंडे, ॲड. ऐश्वर्या जंजाळे, ॲड. अर्चना गोसावी, ॲड. आरती पोखरणा, ॲड. पल्लवी बारटक्के, ॲड. ऋतुजा करमरकर, ॲड. शुभांगी भस्मे, ॲड. शिवानी सादिके, ॲड. चैताली खिलारी, ॲड. नंदिनी कुशवाह, सरकारी वकील ॲड. स्मिता लुहिया, ॲड. उताळे मॅडम, ॲड. सौ. बाबर, ॲड. मनीषा डूबे पाटील, ॲड. ज्योती ठुबे, ॲड. राणी भूतकर, ॲड. संजीवनी कुलकर्णी, ॲड. सुजाता पंडित, ॲड. झरीन पठाण आदींसह मोठ्या संख्येने महिला वकील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार ॲड. अरुणा राशीनकर यांनी मानले.