समाजकारण हेच केंद्रबिंदू ठेऊन राजकीय वाटचाल राहणार -शौकत तांबोळी
अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंजि. फिरोज तांबोळी, कलीम बागवान, इमरान शेख, मोहसीन शेख, जावेद खान, सय्यद खलील, अमोल बागडे आदींसह युवक उपस्थित होते.
इंजि. फिरोज तांबोळी म्हणाले की, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना शौकत तांबोळी यांनी दिशा देण्याचे कार्य केले. तर प्रत्येक सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात योगदान सुरु आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला राष्ट्रवादीच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळाले असून, अनेक गरजूंचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना हाजी शौकतभाई तांबोळी यांनी सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे कार्य केले जाणार आहे. समाजकारण हेच केंद्रबिंदू ठेऊन राजकीय वाटचाल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
