साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या आठव्या काव्य संमेलनात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पांडुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे, कार्याध्यक्ष ह.भ.प. संगीता (माई) गुंजाळ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, सिने कलाकार मोहनीराज गटणे, काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, प्रा. लीला जंजीरे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग आदी उपस्थित होते.
ज्ञानदेव पांडुळे ज्येष्ठ साहित्यिक असून, रयत शिक्षण संस्थेत जनरल बॉडी सदस्य म्हणून काम करत आहे. सामाजिक व शैक्षणिक चळवळीत त्यांचा नेहमी पुढाकार असतो. समाजातील गरजू घटकांना ते सातत्याने आधार देण्याचे काम करत आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.