साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन केले. माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिरात गुरुपूजन करुन संगमनाथ महाराजांचा आशिर्वाद घेतला.
संगमनाथ महाराज यांनी यशस्वी जीवनासाठी गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. विजय भालसिंग यांनी म्हणाले की, गुरु शिष्याला ज्ञानाने प्रकाशमान करुन, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवत असतो.
साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु असून त्यांच्या मार्गदर्शने सुखी जीवनाचा मार्ग सापडतो. गुरुशिवाय जीवन निर्थक व अंधकारमय असल्याचे त्यांनी सांगितले.