प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी-नानी ग्रुप यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा, आरती थोरात, मीरा फोफलीया, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, विद्या कचरे, रजनी भंडारी, ज्योती गांधी, उषा सोनी, शिक्षण तज्ञ जालिंदर वाघ, उपसरपंच महेश निमसे, लिला अग्रवाल, सुरेखा जंगम, विद्या रघुवंशी, जयश्री पुरोहित, उज्वला बोगावत, सुशिला त्रिंबके, अशा गायकवाड, अरुणा गोयल, विजया लखोटीया, मेघना मुनोत, विद्या कचरे, ज्योत्सना कुलकर्णी, नीलिमा पवार, सुजाता कदम, सुनिता काळे, अलका वाघ, प्रिया गायकवाड, लीला पठारे आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ असतो. अशा गुरुजनांचा गौरव करताना त्यांच्या कार्याचे मोल समाजासमोर आणण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकातही सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी गुरुंची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंच्या आज्ञेचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीरा फोफलीया म्हणाल्या की, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ औपचारिक साजरा करण्याचा दिवस नसून, गुरुंच्या मोलाचा विचार करून त्यांच्या कार्याचे जतन करण्याचा दिवस आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षिका आपली सेवा केवळ नोकरी म्हणून न करता, समाज घडविण्याचे कार्य करतात. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होते. शिक्षकांच्या योगदानातून संस्कारी समाज घडत असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका आरती थोरात, शिक्षिका मंगल पवार-भालसिंग, शितल बुधवंत, राखी मरकड, प्रतिमा लाड, जीवन तिपोळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश आणि शालेय साहित्याचे किट वाटण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका आरती थोरात यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीविषयी आणि शिक्षकांचे योगदान यावर प्रकाश टाकला. आभार विद्या कचरे यांनी मानले.