एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम, टिम 57, प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
शारीरिक स्वास्थ्य कमवावे लागते, विकत अथवा उसनवारी मिळत नाही -डॉ. वंदना फाटके
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारीरिक स्वास्थ्य विकत अथवा उसनवारी मिळत नसून, ते कमवावे लागते. दररोज व्यायाम व योगाचा जीवनात समावेश केल्यास निरोगी व आनंदी जीवन जगता येणार आहे. भविष्यातील हॉस्पिटलचा खर्च व त्रास टाळण्यासाठी नियमित व्यायामासाठी घेतलेली काळजी व योग्य आहार शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना डॉ. वंदना फाटके यांनी व्यक्त केली.
सारसनगर येथील एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम, टिम 57, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी स्वास्थ्य जागरुकता कार्यक्रमातंर्गत मार्गदर्शन करताना डॉ. फाटके बोलत होत्या. यावेळी प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, योगिता पर्वते, गीता पर्वते, मनिषा पर्वते, एकता पर्वते, शांभवी जोशी, उपाध्यक्षा वंदना गारुडकर, उषा सोनी, सचिव सविता गांधी, जयश्री पुरोहित, विद्या बडवे, प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षा कुसुमसिंग, अनिता काळे, मेघना मुनोत, ज्योत्सना कुलकर्णी, कविता दरंदले, शकुंतला जाधव, उज्वला बोगावत, राखी जाधव, ज्योती गांधी, मायाताई कोल्हे, वंदना गोसावी, राजश्री पोहेकर, अंजली गायकवाड, लता कांबळे, शोभा भालसिंग, शशिकला झरेकर, शोभा कानडे, आशा गायकवाड, निलीमा पवार, रजनी भंडारी, कालिदास पर्वते, सचिन पर्वते, राज पर्वते, स्वप्निल पर्वते, सचिन काळभोर, प्रशांत काळभोर, सुमित पर्वते, ऋषी पर्वते, योगेश मोहाडीकर, किरण बगळे आदी उपस्थित होते.

शांभवी जोशी म्हणाल्या की, योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. जिम आणि व्यायाम फक्त पुरुषांसाठी नसून, महिलांनी देखील याकडे वळले पाहिजे. सध्याच्या युवतींमध्ये व्यायामाची आवड निर्माण होत असून, व्यायाम फक्त सुंदर सुडौल शरीरासाठी नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे. व्यायामाने भविष्यातील व्याधी व आजार देखील टळतात व जीवन देखील आनंदी बनत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वास्थ्य जागरुकता कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एम.एम.ए. मॅट्रिक्स जिम मध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने विशेष लक्ष दिले जात असून, योगा, झुम्बा आदींसह एमएमए सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.