समाजाला विवेकानंदांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तर युवकांना प्रेरणा देवून स्वामी विवेकानंदांनी नव भारताचा पाया रचला. देशातील युवकांना स्वामी विवेकानंद यांनी दिशा दिली. युवकांचा देश असलेल्या भारताला आज खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज आहे. या महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेऊन प्रत्येकाने देशाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सागर गुंजाळ, ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, वैभव ढाकणे, अभिजित खोसे, धर्मा करांडे, नितीन लिंभोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सागर गुंजाळ म्हणाले की, युवकांच्या माध्यमातून समाजात बदल घडणार आहे. युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती आहे. यासाठी राष्ट्रवादीत युवकांना संधी देण्याचे कार्य सुरु असून, विकासात्मक राजकारणाकडे युवा वर्ग आकर्षिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.