• Fri. Apr 18th, 2025

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगर तालुक्यातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

ByMirror

Apr 9, 2025

अहिल्यानगर शतकोन कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत डंका

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार

नगर (प्रतिनिधी)- संकल्प स्पोर्ट्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नगर तालुक्यातील निमगाव वाघा, कामरगाव, चास येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे.


या गुणवंत खेळाडूंचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सत्कार केला. यावेळी उपसरपंच किरण जाधव, सोसायटी सदस्य अतुल फलके, प्रशिक्षक सुरेश जाधव, सुखदेव जाधव आदींसह खेळाडू उपस्थित होते.


या स्पर्धेत पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील सुमारे 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अहिल्यानगर येथील शतकोन कराटे असोसिएशनमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिके पटकावली.


या स्पर्धेत सहभागी झालेल्या अहमदनगरच्या खेळाडूंमध्ये समर्थ जाधव, संग्राम जाधव, सोहम जाधव, तनु जाधव, शिवम शिंदे, मोहित जाधव, आयुष जाधव, वैष्णवी ठोकळ, सार्थ सोनवणे, सार्थक साठे आणि आदित्य येणारे या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकांची कमाई करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.


या सर्व खेळाडूंना मास्टर सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षक जाधव यांना संकल्प स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय संकल्प भूषण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *