• Wed. Oct 29th, 2025

जायंटस्‌ वेल्फेअरचे मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

ByMirror

Oct 18, 2023

कासवा यांची निवड जायंट्स ग्रुपसाठी अभिमानास्पद -संजय गुगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस्‌ वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मनोज कासवा यांची भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कासवा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तर त्यांची मावळ लोकसभा समन्वयक पदी देखील निवड करण्यात आली. यावेळी माजी राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


या निवडीबद्दल जायंटस्‌ ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. कासवा यांनी जायंटस्‌ ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून निस्वार्थपणे सामाजिक कार्य केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रदेशावर काम करण्याची संधी त्यांना सामाजिक कार्यामुळे मिळाली आहे. कासवा यांची झालेली निवड जायंट्स ग्रुपसाठी अभिमानास्पद असून, त्यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचे प्रश्‍न सुटण्याचे कार्य होणार असल्याची भावना जायंटस्‌ ग्रुपचे संजय गुगळे यांनी व्यक्त केली.
कासवा हे मुळचे लोणी मावळा येथील असून, त्यांनी जायंटस्‌ ग्रुपच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे.

या निवडीबद्दल भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी, जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन व भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष गांधी, नगर अर्बन बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र अग्रवाल, केमिस्ट संघटनेचे अनिल गांधी, अभय मुथा यांनी कासवा यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *