हायजेनिक व मानवसुरक्षित उत्पादनांची माहिती; लेबर/कारागिरांसाठी आरोग्यविषयक जागरूकता
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील फर्निचर व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, सुतार, हार्डवेअर व्यापारी व नवउद्योजकांना आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांची माहिती देण्यासाठी नेरोफिक्स प्रा.लि. यांच्या वतीने मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लेबर/कारागिरांसाठी आरोग्यविषयक जागरूकता व सुरक्षिततेचेदेखील मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक सदगुरु लॅमिनेट्स (डिस्ट्रीब्यूटर) आणि शिवोहम प्लाय हे होते. या कार्यक्रमास कारागीर वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात कंपनीचे तांत्रिक अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह सागर अंबुरे यांनी उपस्थितांना नेरोफिक्सच्या विविध उत्पादने, त्यांच्या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये, गुणवत्तेची खात्री आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेबाबत विस्तृत माहिती दिली. त्यांनी टर्बोफिक्स (फर्निचर व औद्योगिक चिकट पदार्थ), स्कॉट नं. 1(बांधकाम रसायने), विश्वास सीरिज, सुमो सीरिज यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा उद्योगातील वापर, टिकाऊपणा, ताकद, उपयोगिता आणि आधुनिक फॉर्म्युलेशनची प्रत्यक्ष माहिती दिली.
आरोग्य मार्गदर्शन सत्रात बोलताना सागर अंबुरे म्हणाले की, नेरोफिक्सचे सर्व उत्पादने हे हायजेनिक फॉर्म्युलेशनवर आधारित असून रासायनिक घटक नियंत्रित प्रमाणात असल्याने कॅन्सर, श्वसन समस्या, त्वचारोग, फंगल संसर्ग अशा गंभीर आरोग्य धोक्यांपासून कामगारांचे संरक्षण होते. कमी उडून जाणारी वायू संयुगे (लो व्हीओसी) असलेली उत्पादने वापरल्याने दीर्घकाळ संपर्कात राहूनही शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. सुतार, पेंटर, मिस्त्री, साइटवरील मजूर हे सतत रसायनांच्या संपर्कात असतात. त्यांचे संरक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत उत्पादने तयार केली जात असल्याने सेफ फॉर वर्कर्स, सेफ फॉर इंडस्ट्री, ही संकल्पना उद्योगात वेगाने स्वीकारली जात आहे.
अंबुरे यांनी सांगितले की, नेरोफिक्सची उत्पादने फर्निचर व लाकडी काम, एचव्हीएसी आणि डक्टिंग, रिअल इस्टेट व बांधकाम, फोम मॅट्रेस, फर्निशिंग, ऑटोमोबाईल क्षेत्र, प्लायवूड व औद्योगिक अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ग्राहकांच्या गरजेनुसार ‘सानुकूलित उपाय’ देणे हे कंपनीचे सर्वात मोठे बलस्थान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सत्रामुळे शहरातील फर्निचर उद्योग, बांधकाम क्षेत्र, हार्डवेअर बाजार आणि सुतारकाम करणाऱ्या तज्ञांसाठी तांत्रिक माहिती, सुरक्षिततेचे मार्गदर्शन आणि आधुनिक उत्पादनांची ओळख होण्यास मोठी मदत झाली. स्थानिक व्यावसायिकांनी नेरोफिक्सची उत्पादने स्वीकारल्यास गुणवत्तेत, टिकाऊपणात आणि कामगारांच्या आरोग्य सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित राहून कारागीर वर्गाने कंपनीच्या विविध उत्पादनांची माहिती जाणून घेतली.
