ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गावातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज व पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मिरी (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांची मोफत सर्व रोग तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. ओम चैतन्य वाकोजी बाबा सप्तवृक्षपदी वृंदावन गोशाळेच्या दुसरा स्थापना दिवस व कै.सुखदेव माधवराव वेताळ यांच्या पुण्यस्मरणार्थ घेण्यात आलेल्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराप्रसंगी गावातील आजी-माजी सैनिक, अमरनाथ व नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकांचा सत्कार करण्यात आला. सोनाली बाळासाहेब काकडे या युवतीची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. डॉ. नरसाळे, निमसे, सरपंच संतोष शिंदे, ह.भ.प. गिरधारी डहाळे, वृध्देश्वर साखर कारखानाचे चेअरमन चारुदत्त वाघ, सुभाष गवळी, कारभारी गवळी, नंदू बनकर, विजय गवळी, बाबासाहेब गवळी, राजेंद्र तागड, नाना सादरे, बाळासाहेब सादरे, झाडे, डॉ. संदीप ससे, डॉ. अक्षय बांगर, डॉ. धनंजय ठाकरे, डॉ. मिलिंद कांबळे, बापु वाघमोडे, साईनाथ नवल, डॉ. दारकुंडे, शिवाजी कोरडे, संभाजी कोरडे, आदिनाथ कराळे, आदिनाथ वनारसे, अरूण वाबळे, कैलास वाबळे, अनिता वेताळ, शिवाजी वेताळ, संतोष म्हस्के, संजय कराळे, भागीनाथ गवळी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, ॲड. महेश शिदे, पोपट बनकर, मयुर मुखेकर, मेजर राजळे, मेजर शिकारे, अशोक गोरे, मेजर गायकवाड, फाटके, नजन, पाटेकर, आठरे, तुपे, गंगाराम शिपणकर, गंगाधर नवल, आदिनाथ तागड, ह.भ.प. नामदेव वेताळ, मेजर शिदोरे, बनसोडे, गवारे, मेजर कोळसे, घाडगे, भानुदास केळकदे, अंकुश म्हस्के, आदिक, आप्पासाहेब सोनवणे, मेजर भिडे, अनिल घोरपडे, बाबासाहेब आवारे, अरूण दुखे, बामणे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी निरोगी आरोग्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन करुन आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायामाचा सल्ला दिला. या शिबिरात ग्रामस्थांची नेत्र तपासणी, स्त्री रोग, बाल रोग व त्वचारोगबद्दल तपासण्या करण्यात आल्या. यामधील गरजू रुग्णांवर पुढील उपचार व शस्त्रक्रिया विळदघाट येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी वेताळ यांनी केले. आभार अनिता वेताळ यांनी मानले.
