गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी महिलांनी आजाराबाबत जागृक रहावे -डॉ. ऋषिकेश पंडित
सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकीनबद्दल मार्गदर्शन
नगर (प्रतिनिधी)- गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी महिलांनी आजाराबाबत जागृक राहिले पाहिजे. लहान-मोठे आजारांकडे दुर्लक्ष न करता विविध तपासण्या करून घेतल्यास वेळीच गंभीर आजार टाळता येणार आहे. दररोज व्यायाम, योगा, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, कडधान्य, फळे खाणे व वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास निरोगी सदृढ जीवन जगता येणार असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पंडित यांनी केले.

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागरदेवळे (ता. नगर) येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पंडित बोलत होते. पंडित हॉस्पिटलच्या सहयोगाने झालेल्या या शिबिरात महिलांमध्ये सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकीनबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य मार्गदर्शक पवन अंजनकर, डॉ. मोनिका पंडित, कावेरी कैदके, स्वाती डोमकावळे, आरती शिंदे, जय युवाच्या संचालिका जयश्री शिंदे, स्वाती कोकाटे, ॲड. विद्या शिंदे, डॉ. प्रिया, डॉ. संतोष गिऱ्हे, माहेरच्या रजनी ताठे, पोपट बनकर, सुनील शिंदे, उज्वला उल्हारे, भारती शिंदे, भारती तांबे, कोमल शिंदे, राजश्री साळुंखे, ज्योती शिंदे, मनीषा शिंदे, रोहिणी धीवर, सुमय्या शेख, पूजा ठुबे, रोहिणी पुंड, सुवर्णा कैदके, छाया सुडके, स्वाती शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिनेश शिंदे, ॲड. महेश शिंदे, ॲड. प्रशांत साळुंके, डॉ. रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, मेजर भीमराव उल्हारे, अनिल साळवे, विनायक नेवसे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पवन अंजनकर यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरताना आयुर्वेदिक नॅपकिन वापरले तर सर्वाइकल कॅन्सरचा धोका टाळता येणार आहे. कापसाचा वापर असलेली सॅनिटरी नॅपकिन वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ महिला सुशीला शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जयश्री शिंदे यांनी महिलांना स्वयंरोजगार क्षेत्रात व उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन आर्थिक सक्षम होण्याचा संदेश दिला. यावेळी अपूर्वा लेडीज शॉपीचे उद्घाटन देखील करण्यात आले.
या शिबिरात विजय लाईन चौक, नागरदेवळे, आलमगीर परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, संतोष लयचेट्टी, बाळासाहेब पाटोळे, दीपक बनकर, रामेश्वर राऊत, ॲड. दिलीपराज शिंदे, गोरक्षनाथ ओहोळ, प्रसाद शिंदे, हमिद शेख, प्रा. उमेश शिंदे, तांबे सर, नंदकुमार पाटील, अण्णासाहेब पाटोळे, जयेश शिंदे, तुषार शेंडगे, अमोल तांबडे, गायत्री गुंड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजन ॲड. प्रशांत साळुंखे यांनी केले होते. आभार पोपट बनकर यांनी मानले.