• Wed. Oct 29th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी

ByMirror

May 26, 2024

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल -किरण धोका

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक बनले आहे. सेवेसाठी हातभार लावणारे व सेवा कार्याचा लाभ घेणारे या आरोग्यमंदिराकडे ओढले जात आहे. या आरोग्यसेवेची ख्याती संपूर्ण राज्यात पसरली असून, या आरोग्य मंदिरातून चोवीस तास मानवसेवा घडत आहे. या मानवसेवेच्या कार्यात हातभार लाऊन आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना किरण धोका यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पुणे येथील व्यापारी स्व. घेवरचंदजी चुनिलालजी धोका यांच्या स्मरणार्थ धोका परिवाराच्या वतीने आयोजित मोफत ह्रद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी किरण धोका बोलत होत्या. यावेळी सुहास धोका, वैभव धोका, नितीन धोका, सुशील धोका, लौकिक धोका, रोहन धोका, रिदित धोका, प्रकाश छल्लाणी, मंगलताई छल्लाणी, वर्षा संचेती, चंदन काठेड, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. वसंत कटारिया, निखीलेंद्र लोढा, डॉ. आशिष भंडारी, कार्डिओलॉजीस्ट डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये असलेला अद्यावत कार्डियाक विभाग आरोग्यसेवेचा आधार असून, कॅथलॅब देशातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. कार्डियाक विभागात लहान मुलांपासून वयोवृध्दां पर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहे. हॉस्पिटलमध्ये अद्याप पर्यंत 50 हजारपेक्षा जास्त बायपास सर्जरी, 70 हजारपेक्षा अधिक एन्जोप्लास्टी व एक लाखापेक्षा अधिक अँजिओग्राफी करण्यात आलेली आहे. तसेच 6 हजार लहान बालकांच्या ह्रद्यरोग संबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सेवाकार्यात प्रकाश छल्लाणी परिवाराचे मोठे योगदान मिळत असून, पुणे येथील त्यांची दिलेली मुलगी, जावई आणि संपूर्ण धोका परिवार या सेवा कार्यात जोडले गेले आहे. सेवा कार्याच्या संस्कारातून त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी छल्लाणी व धोका परिवाराचे सेवा कार्याचे कौतुक केले.


वर्ष संचेती म्हणाल्या की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये चोवीस तास रुग्णसेवा केली जात आहे. या सेवा कार्यात सर्व संचालक तन-मन-धनाने योगदान देत असून, निस्वार्थ भावनेने त्यांची सुरू असलेली सेवा प्रेरणादायी आहे. सेवेचे संस्कार कुटुंबातूनच मिळाले असल्याने या सेवा कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात 125 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. तर शिबिरात सहभागी गरजूंची 3 हजार रुपयात अँजिओग्राफी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार निखीलेंद्र लोढा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *