• Wed. Oct 15th, 2025

शहरात रविवारी मातंग समाजाचे मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Dec 27, 2024

समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

निस्वार्थपणे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा लहु रत्न गौरव पुरस्काराने होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाजाचा मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.29 डिसेंबर) रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सावेडी, भिस्तबाग रोड येथील सोनापार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर यावेळी समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना लहु रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या मेळाव्यात समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आमदार जितेश अंतापूरकर, कॉन्ट्रॅक्टर बाळकृष्ण जगधने, लक्ष्मीकांत भालेराव उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील मातंग समाज मोठ्या प्रमाणात नोकरी उद्योग धंदे- व्यवसाय व इतर कारणाने ग्रामीण भागातून शहरात आले असल्याने समाज विखुरला गेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकवटणार असून, वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींचे लग्न जमविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. योग्य व अनुरूप असा जोडीदार निवडण्यासाठी संस्थेच्या वतीने वधु वर परिचय मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. मातंग जातीतील हिंदू, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन व इतर धर्मियांचा सहभाग असतो. या मेळाव्यास संपूर्ण राज्यातून मातंग समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक भगवान जगताप यांनी दिली.


या वर्षीचे लहु रत्न गौरव पुरस्कार उत्तमराव शेलार, ईश्‍वर गायकवाड, दिनकरराव लांडगे, किशोर बावणे, नंदकुमार सोनवणे, डॉ. भालेराव, गुलाबराव मिसाळ, राजू घाटगे, भारत पवार, नारायण डोलारे, डॉ. रवी खडसे, बाळासाहेब वैरागर, दिनकरराव सकट, मनोज उल्हारे, मंगलताई दावने, विनोद वैरागर, संजयराव पोटफाडे, बाळासाहेब गायकवाड, मनोहर आरणे, राहुल खडसे यांना जाहीर झाले आहे. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सदर पुरस्कार्थींना सन्मानित केले जाणार आहे.


हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दादू नेटके, उपाध्यक्ष संजय मंडलिक, सचिव अनिल जगताप, नामदेव रोकड, भास्कर अडागळ, भरत उमाप, शरद काळोखे, विजय वावरे, रवींद्र जगताप, बाबासाहेब शेलार, डॉ. सुनील साठे प्रयत्नशील आहेत. मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची फी अथवा शुल्क आकारले जाणार नसून, अधिक माहितीसाठी दादू नेटके 9272513071 व अनिल जगताप 9922714353 यांन संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *