• Wed. Nov 5th, 2025

निमगाव वाघा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी

ByMirror

Nov 3, 2023

एकता फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

आरोग्य व शिक्षण प्रगतीचा पाया -अतुल फलके

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तानवडे लॅबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.


शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शिबिराचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी एका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके, कृषी सहाय्यक रमेश खाडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्षा दिपाली ठाणगे, माजी सरपंच अरुण कापसे, मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, तानवडे लॅबचे प्रवीण शिंदे, राहुल नरवडे आदी उपस्थित होते.


अतुल फलके म्हणाले की, आरोग्य व शिक्षणाप्रती जागृक राहिल्यास मनुष्य जीवनात प्रगती करु शकतो. आरोग्य व शिक्षण प्रगतीचा पाया आहे. चांगले आरोग्य लाभल्यास जीवनातील ध्येय गाठता येते. तसेच विद्यार्थ्यांना रक्तगट माहित असणे अत्यावश्‍यक बाब आहे. काही दुर्घटना घडल्यास तातडीने रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्त गट माहित असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड यांनी एकता फाउंडेशनने शाळेत राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *