• Sat. Mar 21st, 2026

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी खरेदीला उत्साहाची उधळण

ByMirror

Mar 21, 2026

हायब्रीड वाहनांना ग्राहकांची विशेष पसंती; शोरूममध्ये दिवसभर गर्दी


वासन टोयोटात 40 चारचाकी वाहनांचे वितरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक शुभदिनी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा जपत अनेकांनी आपल्या स्वप्नातील गाडी खरेदी केली. विशेषतः केडगाव येथील वासन टोयोटा शोरूममध्ये ग्राहकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.


गुढी पाडव्याच्या निमित्ताने वासन टोयोटात दिवसभरात तब्बल 40 चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी कुटुंबासह शोरूममध्ये हजेरी लावली होती. प्रत्येक वाहनाची विधीवत पूजा करूनच वितरण करण्यात येत असल्याने वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले होते. शोरूम परिसर दिवसभर गजबजलेला होता.


या प्रसंगी वासन ग्रुपचे प्रमुख विजय वासन आणि तरुण वासन यांनी ग्राहकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. तसेच शोरूमचे जनक आहुजा, अनिश आहुजा यांच्यासह सेल्स टीमचे प्रतिनिधी ग्राहकांचे स्वागत व मार्गदर्शन करत होते. वाहन वितरणासाठी आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले व माजी महापौर संदीप कोतकर, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, नितीन बारस्कर, महेश तवले, मर्चंट बँकेचे संचालक किशोर मुनोत आदींनी शोरुमला भेट दिली.


वाहन बाजारात जागतिक दर्जाच्या कंपनी म्हणून ओळख असलेल्या टोयोटा मोटार कॉर्पोरेशन च्या वाहनांना ग्राहकांकडून विशेष प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी दिसून आले. मोठ्या वाहनांमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर ला ग्राहकांची पसंती मिळत असून, शहरातील वापरासाठी टोयोटा ग्लांझा, टोयोटा टायझर तसेच सात आसनी टोयोटा रुमीअन या मॉडेल्सना चांगली मागणी आहे. यावर्षी सेल्फ टोयोटा हायरायडरची अधिक विक्री झाली. यासोबतच बॅटरी आणि पेट्रोलचा संयुक्त वापर करणाऱ्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर या स्मार्ट हायब्रीड वाहनाकडे ग्राहकांचा विशेष कल असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.


गुढी पाडव्याच्या शुभदिनी वाहन खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि हायब्रीड वाहनांबद्दलची वाढती आवड यावरून शहरातील ग्राहक आता पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे झुकत असल्याचे जनक आहुजा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *