कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रभारी प्रबंधकपदी एस.के. मोहोळकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी (अण्णा) कराळे, ॲड. पोपट म्हस्के, अहमदनगर वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. रघुनाथ मुरूमकर आदी उपस्थित होते.
ॲड. लक्ष्मण कचरे म्हणाले की, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कौटुंबिक न्यायालयाला अनुभवी अधिकारी मिळाला आहे. न्यायालयीन कामकाजातील त्यांचा 26 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. सुरेश लगडे यांनी कौटुंबिक न्यायालयातील वकील बंधू, भगिनी व कर्मचारी यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे समन्वय राहण्यासाठी प्रबंधकांची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केले.
ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी न्यायालयातील कामकाज करत असताना नवनियुक्त प्रबंधक यांचे सहकार्य राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. आभार ॲड. राजेश कावरे यांनी मानले. यावेळी सहाय्यक अधीक्षक एस.जी. काकडे, सौ.ए.पी. झिंजे, डी.ए. नारखेडे, एस.आर. मेहत्रे, एस.बी. अळकुटे, श्रीमती एल.एस. जाधव, एस.के. जाधव, श्रीमती एस.एस. चव्हाण आदींसह कर्मचारी वर्ग व वकील मंडळी उपस्थित होते.