लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीवर योग्य व्यक्तींची निवड -न्यायाधीश संगिता ना. भालेराव
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे व व्हाईस चेअरमन ॲड. संदीप पाखरे यांचा सत्कार करण्यात आला.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश संगिता ना. भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालयाचे उपाध्यक्ष तथा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, ॲड. प्रकाश गायकवाड, ॲड. एस.पी. गवते, माजी अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. संजय पाटील, ॲड. सखाराम टकले, ॲड. सुदाम गवते, ॲड. संतोष कांडेकर, ॲड. संदीप शेळके, ॲड. यशवंत ठोंबरे, ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. विजया कोतकर, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. आनंद सूर्यवंशी, कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक अलका राठोड, प्रबंधक सावता मोहोळकर, नाझर असिफ शेख, कर्मचारी अर्चना झिंजे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात कौटुंबिक न्यायालयाचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड यांनी लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीची माहिती देऊन वकीलांच्या विविध प्रश्नासाठी नवनिर्वाचित चेअरमन ॲड. कचरे व व्हाईस चेअरमन ॲड. पाखरे सातत्याने प्रश्न मांडून ते सोडविण्याचे काम करत आहे. त्यांची झालेली निवड ही सर्व वकीलांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायाधीश संगिता ना. भालेराव म्हणाल्या की, नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन दोन्ही सक्रिय वकील म्हणून कार्यरत आहेत. वकील संघाचे नेहमीच सहकार्य मिळत असते. लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीवर योग्य व्यक्तींची निवड झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. शिवाजी कराळे पाटील म्हणाले की, लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीला मोठा इतिहास आहे. अनेक ज्येष्ठ वकीलांनी या सोसायटीचा कारभार पाहिला आहे. नुकतेच निवड झालेले चेअरमन व व्हाईस चेअरमन हे लोकशाही पध्दतीने निवडून आलेले आहेत. जुन्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीची एक खिडकी योजना सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तर यामुळे वकिलांचा तिकीट, स्टॅम्पचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेअरमन ॲड. लक्ष्मण कचरे यांनी वकिलांना कमीपणा येईल असे वर्तन व काम होणार नाही. सेवा देण्याच्या उद्देशाने कार्य राहणार आहे. तन, मन, धनाने वकिलांसाठी सुविधा देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन ॲड. संदीप पाखरे म्हणाले की, कौटुंबिक सत्कार झाला असून, कौतुकाची थाप मिळाल्याने आणखी चांगले काम करण्यास ऊर्जा मिळणार आहे. सोसायटीच्या अडचणी समोर ठेवून सर्वांच्या सहकार्याने हे प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कावरे यांनी केले. आभार राजाभाऊ शिर्के यांनी मानले.