• Wed. Jul 2nd, 2025

रेल्वे स्टेशन येथील युवकांचा शिवसेनेते प्रवेश

ByMirror

Dec 14, 2024

शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रासह शहरातही -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे, युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे, सचिन राऊत, सुनिल भिंगारदिवे, हनीफ शेख, सुनील लांडगे, प्रवीण कांबळे, सागर पोळ, बाळासाहेब बोरुडे, गणेश बोरुडे, शाहू पाथरे, विजय गायकवाड, प्रवीण कांबळे, गणेश बोरुडे, कुमार डाके, भैय्या शेख, महेश वाकचौरे, संदीप साळवे, अंकुश सकट, सुरज सरोदे, मनोज वाकचौरे, आनंद गुजर, विजय भानगडी, अक्षय सूर्यवंशी, पिनू भाऊ, आकाश पिसका, सुनील भिंगारदिवे, गंगाराम थोरात, गणेश पोळ, वसीम शेख, शरद वाघचौरे, सचिन शिंदे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सचिन जाधव म्हणाले की, शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रासह शहरात दिसत आहे. महायुती सरकार सत्तेवर आली असताना शहराची भरीव पध्दतीने विकासात्मक घौडदौड सुरु राहणार आहे. युवक विकासात्मक राजकारणाकडे आकर्षित होऊन शिवसेनत दाखल होत आहे. शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना संधी देण्याचे काम केले. तर राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण जपण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसैनिकांची राहिली आहे. गोरगरिबांच्या प्रश्‍नावर झटणारा हा पक्ष असून, स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांचे हिंदूत्वाचे विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे म्हणाले की, शहरात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भरीव निधीतून शहरातील अनेक प्रलंबीत विकास कामे मार्गी लागली असून, विकासात्मक व्हिजनने सुरु असलेल्या कार्यामुळे युवक शिवसेनेत दाखल होत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *