अंगद महारनवर यांची शहर संघटकपदी तर सुनिल भिंगारदिवे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती
आजही शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला -सचिन जाधव
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) पक्षात केडगाव व रेल्वे स्टेशन भागातील मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झालेले केडगावचे सामाजिक कार्यकर्ते अंगद देविदास महारनवर यांची शहर संघटकपदी तर रेल्वे स्टेशन येथील कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलेले सुनिल अर्जुन भिंगारदिवे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करुन नवनिर्वाचित पदाधिकारी महारनवर व भिंगारदिवे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जाधव यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर युवकांमध्ये असलेल्या त्यांच्या जनसंपर्कामुळे युवा वर्ग शिवसेनेते दाखल होत आहे. विधानसभेच्या तोंडावर शहरात युवा शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा संघटक दिगंबर गेंट्याल, अमोल हुंबे, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, प्रवक्ते विशाल शितोळे, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता विभागाचे जिल्हाप्रमुख रणजित परदेशी, उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे, उपशहर प्रमुख सचीन राऊत, भिंगार छावणीचे माजी नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, सुदेश गाडेकर, किरण जव्हेरी, प्रज्वल पारखे, सचिन ठाणगे, रोहित पाथरकर, अभिजीत तांबडे, विजय जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, आजही शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसैनिकांची राहिली आहे. गोरगरिबांच्या प्रश्नावर झटणारा हा पक्ष असून, स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांचे हिंदूत्वाचे विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरु आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या असून, त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य शिवसैनिक करणार आहेत. माथाडी कामगारांचे नेते सुनील भिंगारदिवे तर सामाजिक कार्यकर्ते अंगद महारनवर यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिगंबर गेंट्याल यांनी सर्वसामान्यांचे सरकार सत्तेवर असून, सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शिवसेनेने शहरातील अनेक गुंडांची दादागिरी संपवली असून, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला आहे. शिवसैनिक हे अहोरात्र सर्वसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्ते आहे. जनेतेच्या सेवेतून हा पक्ष मोठा झाला आहे. हिंदुत्वासाठी काम करणारे शिवसैनिक आजही कोणतीही अपेक्षा न ठेवता इमानदारीने काम करत आहे. शिवसैनिक हा अन्यायाचा बिमोड करणारा व सर्वसामान्यांना न्याय देणारा असल्याचे सांगून, संघटित राहून वाघा सारखे जगण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.