राज्य सदस्यपदी दिनेश डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत पालवे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मानव विकास परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी दिनेश अशोक डेमला व युवक जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रांत सुदर्शन पालवे यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख म्हणाले की, मानव विकास परिषदेच्या माध्यमातून शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले जात आहे. शोषणमुक्ती व भ्रष्टाचारमुक्तीच्या उद्देशाने संस्था प्रयत्नशील आहे. सर्वसामान्यांची सरकारी कार्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी व सर्वसामान्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटनेचा लढा सुरु आहे. या कार्यासाठी युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणात या चळवळीशी युवक जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
डेमला व पालवे यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची संघटनेवर निवड करण्यात आली आहे. तसेच समाजातील उपेक्षित घटकांच्या विविध अडीअडचणी सोडवून त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील राहून कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी भावना व्यक्त केली.
