• Fri. Jun 6th, 2025

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आठ सर्पाची निसर्गात मुक्तता.

ByMirror

Jun 5, 2025

सर्पमित्र कृष्णा बेरड यांनी नागरी वस्तीतून धरलेले नाग, घोणस, धामिन, कोब्रा, अजगर सरपाची निसर्गात मुक्तता.

नगर (प्रतिनिधी)-शहरानजीक असलेल्या मेहेकरी सारोळा बारादरी शहापूर बारा बाभळी केतकी अशा विविध ठिकाणाहून नागरी वस्तीत आढळून आलेले नाग, घोणस, धामिन, कोब्रा, अजगर सरपाची सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांनी धरलेले साप पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आठ सर्प निसर्गात मुक्तता केली. सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड यांनी वन अधिकारी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साप निसर्गात मुक्त केले यावेळी सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड समवेत ओम जंगम, मकरंद देशमुख, नवनाथ कापसे, आनंद दळवी, राहुल साळुंखे, ऋषिकेश खामकर आदी उपस्थित होते.


यावेळी सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड म्हणाले की, नागरिकांनी काळजी घ्या साप जगवा निसर्ग वाचवा हे ब्रीद वाक्य म्हणत पावसाळ्याचे दिवस असल्याने नाग, घोणस, धामिन, कोब्रा, अजगर आधी विविध प्रजातीचे सर्प भरपूर प्रमाणात आढळून येतील तरी नागरिकांनी सरपांना न मारता सर्प आढळल्यास मो. 9370075555 / 9665075555 सर्पमित्र कृष्णा पाटील बेरड यांना संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *