अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणारे डॉ. मगर देतात युवकांना प्रेरणा व मार्गदर्शन
वयाच्या 53 व्या वर्षी 79 वजन गटात उचलला 116 किलोचा बार
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे (स्वायत्त ) शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बाळासाहेब मगर यांनी राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक पटकाविले.
बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, राउरकेला (ओडिसा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स वेट लिफ्टिंग स्पर्धेत डॉ. मगर यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन सुवर्ण पदकाची कामगिरी करत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. 79 वजन गटात 116 किलो वजन त्यांनी उचलले. मगर यांनी या अगोदर गुजरात, बडोदा, केरळ, तिरुअनंत पुरम, वाराणसी, गोवा येथे झालेल्या मास्टर्स गेम्स वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती.
डॉ. मगर हे नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई या खेडेगावातील रहिवाशी असून, ते सध्या न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना या खेळात अनेक खेळाडू घडवीत आहे. त्यांनी महाविद्यालतील खेळाडूंना वेट लिफ्टिंग या खेळ प्रकारात प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यांनी घडविलेल्या खेळाडूंनी देखील राष्ट्रीय पातळीवर शहराचे नाव उंचावले आहे. खेळाडूंबरोबर ते सुद्धा वेट लिफ्टिंग खेळाचा सराव करत मास्टर्स गेम्स स्पर्धेत भाग घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. मगर हे त्यांच्या महाविद्यालयिन दशेत देखील पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय खेळाडू होते. आज देखील ते महाविद्यालयातील खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी वेट लिफ्टिंगचा सराव करत आहेत.
त्यांनी शारीरिक शिक्षिण या विषयांची शारीरिक शिक्षण व खेळ आणि वेट ट्रैनिंग हे दोन पुस्तके देखील प्रकाशित केले आहेत. तसेच ते शारीरिक शिक्षण या विषयाचे पीएच.डी.मार्गदर्शक देखील आहेत. वयाच्या 53 व्या वर्षी देखील राष्ट्रीय स्तरावरील वेट लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपदक मिळवणारे डॉ. मगर विद्यार्थी, खेळाडू व समाजासाठी संदेश देतात की, अगर उम्र को हराना है तो शौक जिंदा रखिए!
त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे पाटील, संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त नंदकुमार झावरे पाटील, जी.डी. खानदेशे, मुकेश दादा मुळे व सर्व विश्वस्त व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, समन्वयक डॉ.बी.एच. झावरे, उपप्राचार्य डॉ.संजय कळमकर, डॉ. अनिल आठरे, डॉ. किसन अंबाडे, प्रबंधक बबन साबळे, कार्यालय अधिक्षक राजू पाटील, जगन्नाथ सावळे सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षेतर कर्मचारी, जिमखाना विभागातील प्रा. धन्यकुमार हराळ, प्रा. धनंजय लाटे, प्रा. सुधाकर सुंबे, आकाश नढे, तुषार चौरे यांनी डॉ. मगर यांचे अभिनंदन केले.