कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास एकदिवसीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत सकारात्मक व्यक्तिमत्वाचे धडे देण्यात आले.
या कार्यशाळेत जिनिव्हाचे सह-संस्थापक डॉ. ज्योती राव, श्रीमती मॅरिलिन ऑलिव्हर आणि दिनेश यांनी उपस्थितांना उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये व्यावसायिक सौंदर्य आणि शिष्टाचार, कामाच्या ठिकाणी संवादाचे महत्त्व, सकारात्मक व्यावसायिक प्रतिमा कशी सादर करावी?, आपला आत्मविश्वास कसा सादर करावा। आणि न्युरो-भाषिक प्रोग्रामिंगचा व्यक्तिमत्व विकासावर होणारा चांगला परिणाम या विषयावर माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत विविध तज्ञ व्यक्तींनी विविध विषयावर युवक-युवतींशी संवाद साधला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी निलेश म्हस्के, अमित कडू, विन्सी विल्सन, रेबिका साळवे, अमोल अनाप यांनी परिश्रम घेतले.