• Wed. Mar 12th, 2025

डॉ. अशरफी यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप

ByMirror

Apr 30, 2024

अशरफी यांच्या व्यवहाराशी एमआयएमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार डॉ. परवेझ अशरफी यांच्या उमेदवारी अर्जानंतर व माघार नंतरही राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अशरफी यांच्यावर उमेदवारी करण्यासाठी व माघार घेण्यासाठीही आर्थिक व्यवहार झाला असल्याचा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आरोप केला आहे.


डॉ. परवेझ अशरफी यांनी एमआयएमच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना कुठल्याही पदाधिकारीला विश्‍वासत घेतलेले नाही. एमआयएमची धुरा सांभाळणारे डॉ. अशरफी भविष्यात समाजाचे मोठे नुकसान करू शकतात. निवडणुक लढविण्या अगोदर सर्वात प्रथम समाज व पक्षाचे पदाधिकारी यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते. अर्ध्या रात्री उमेदवारी करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी एकप्रकारे एमआयएम पक्ष व समाजाला निवडणुकीत विकण्याचा घाट घातला होता; हे परिस्थितीनुसार सिध्द होत असल्याचे एमआयएमचे कार्याध्यक्ष मतीन शेख व युवक अध्यक्ष अमीर खान यांनी म्हंटले आहे.


येणाऱ्या काळात एमआयएम पक्षाचे सर्व पदाधिकारी व समस्त मुस्लिम समाज डॉ. अशरफी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. समाजाची सुपारी घेऊन समाज विकण्याचा काम असे समाजकंटक करत आहे. डॉ. अशरफी यांनी केलेल्या व्यवहाराशी एमआयएम पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *