• Thu. Oct 16th, 2025

भिंगारमध्ये आरपीआयच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Apr 15, 2025

बाबासाहेब वंचित, उपेक्षित, मागास घटकांसाठी क्रांतीचे प्रतीक -अमित काळे

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनीलराव काळे, रिपाई भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, शिवसेना शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित सदस्य वसंत राठोड, नगरसेवक रवी लालबोंद्रे, माजी सरपंच युवराज पाखरे, माजी उपसरपंच कैलास पगारे, यशवंत भांबळ, विक्रम चव्हाण सर, गौतम कांबळे, अजय पाखरे, राजू दहीहंडे, किशोर भगवाने, राधेलाल नकवाल, संतोष छजलाने, मुकेश बैद, इंद्रजीत सिंग, प्रमोद जाधव, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल आण्णा बेलपवार, उपसरपंच रोहित भुजबळ, दीपक भिदोरिया, बाळा बनसोडे, प्रकाश लुनिया, किशोर कटोरे, चंद्रकांत ठोंबे आदींसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अमित काळे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माता नव्हते, तर ते वंचित, उपेक्षित, मागास घटकांसाठी क्रांतीचे प्रतीक होते. त्यांनी मानवतेच्या मूलभूत मूल्यांची स्थापना करत स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचे तत्वज्ञान मांडले. आज जो आपण मत देतो, समान संधी मिळवतो, तो अधिकार बाबासाहेबांमुळेच आहे. त्यांचे विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


अक्षय कर्डिले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ फक्त मागासवर्गीयांसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दाखविलेला शिक्षणाचा मार्ग आजही युवापिढीसाठी प्रकाशस्तंभ आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि आज केंद्र सरकार त्याच दिशेने कार्य करत आहे. अशोक गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषण, विषमता आणि अन्यायाविरोधात लढा दिला. त्यांनी आपल्याला फक्त अधिकार दिले नाहीत, तर स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणाही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित काळे यांच्या वतीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणला. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करताना परिसरात भीमगीतांचा गजर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *