• Tue. Jun 3rd, 2025

खासदार निलेश लंके यांच्याकडून डोंगरे यांचा गौरव

ByMirror

May 22, 2025

मराठी साहित्य मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल सत्कार


डोंगरे यांचे साहित्य, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील निस्वार्थ योगदान प्रेरणादायी -खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळ (मुंबई) या संस्थेच्या नगर तालुका अध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांचा विशेष सत्कार करून गौरव केला. यावेळी मराठी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, साहित्यिक भारत सातपुते, कवी आनंदा साळवे, गझलकार रज्जाक शेख, कवयित्री सरोज आल्हाट, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव आदी साहित्यप्रेमी आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती.


पै. नाना डोंगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात साहित्य चळवळ अधिक जोमाने उभी करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने नुकतेच निमगाव वाघा (ता. नगर) येथे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. तसेच त्यांनी राज्यस्तरीय आठ काव्य संमेलनांचे आयोजन करून नवोदित कवी, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना चालना देण्याचे काम केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन मराठी साहित्य मंडळ (मुंबई) या संस्थेच्या नगर तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.


सत्कारप्रसंगी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, डोंगरे यांनी साहित्य, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात दिलेले निस्वार्थ योगदान प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागात मराठी साहित्याची मशाल पेटवत त्यांनी नव्या पिढीतील साहित्यिक व कवींना दिशा दिली आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *