संतोष कानडे यांच्या पुस्तक भेट उपक्रमाचे कौतुक
आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी पुस्तक भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पोलीसांबद्दल समाजात प्रतिमा उंचावण्यासाठी उत्कृष्टपणे कार्य सुरु केलेले आहे. पोलीसांबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संधी उपलब्ध करुन दिली. तर सर्वसामान्यांचे प्रश्न देखील सोडविण्याचे काम प्राधान्याने होत असल्याचे संतोष कानडे यांनी सांगितले. तसेच पुस्तक भेट उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.
पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सामाजिक जीवनात प्रत्येकाने साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्यातून जीवनाचा खरा उलगडा होतो, इतरांचे विचार आणि अनुभव मार्गदर्शक ठरतात. सृजनशील समाज घडविण्यासाठी साहित्य वाचन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगून, उपक्रमाचे कौतुक केले. कानडे यांनी वाढदिवस, स्नेहभेट, राष्ट्रीय सण-उत्सव, राष्ट्रपुरुष जयंती, पुण्यतिथी निमित्ताने शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांना पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी 500 पुस्तके भेट दिली आहेत.