जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन 2024-25 साठी नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणीचे शुक्रवारी 11 एप्रिल रोजी निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे व नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने पै. श्री पंकज हारपुडे व पै. महेश मोहोळ मित्र परिवाराच्या वतीने 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 12 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ पाठविला जाणार असून, त्याची निवड या निवड चाचणीद्वारे होणार आहे.
शुक्रवारी सकाळी 9 ते 10 कुस्तीपटूंचे वजन होणार आहे. तर 11 वाजता कुस्तीला प्रारंभ होणार असून, वजनगट 45, 48, 51, 55, 60, 65, 71, 80, 92 व 110 किलो पर्यंन्तच्या गटात ही निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 2007 ते 2008 जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. ही कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन 2024 वर्षातील आहे. स्पर्धेला येताना आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र, बोनाफाईड, दहावी किंवा बारावीचे बोर्डाचे प्रमाणपत्राची सत्यपत्र आणि प्रत्येकी एक झेरॉक्स आणणे अनिवार्य असल्याचे म्हंटले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै. युवराज पठारे, पै. नामदेव लंगोटे, पै. विलास चव्हाण, पै. बाळासाहेब भापकर, पै. संदिप डोंगरे, पै. मोहर हिरनवाळे, पै. प्रताप चिंधे, पै. ऋषीकेश धांडे, पै. सुनिल भिंगारे, पै. विक्रम बारवकर, पै. संदीप बारगुजे, पै. बबलू धुमाळ, पै. पप्पू शिरसाठ आदी परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.