प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्यरत व गरजू विद्यार्थ्यांना पाठबळ देणाऱ्या प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 50 गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्ष उषा सोनी, मीरा पोपलीया, सचिव हिरा शहापुरे, लीला अग्रवाल, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, रजनी भंडारी, नीलिमा पवार, लता डेंगळे, विद्या बडवे, आशा गायकवाड, मुख्याध्यापक नंदू धामणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परभाणे, उपाध्यक्ष सचिन भगत, सरपंच नमिता पंचमुख, उपसरपंच ज्योती परभाणे, जीवनलता पोखरणा, अनुराधा फलटणे, आशा कटारे, भगवती चंदे, आरती थोरात, बेबीसोनी मंडलेचा, सोहनी पुरनाळे, मीरा पोफलिया, पवन लांडगे, भाऊसाहेब चव्हाण, शिक्षिका सोहनी पुरनाळे, प्रीती वाडेकर, आबा लोंढे, संजय दळवी, हेमाली नागापुरे, अपर्णा अव्हाड, वर्षा कासार, राजेंद्र काळे आदींसह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात मिळव्यात या उद्देशाने ग्रुपच्या महिला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. विविध जिल्हा परिषद व खासगी संस्थेच्या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, शहरातील महिलांनी एकत्र येत, भावी पिढीला शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. आजची मुले सक्षम झाल्यास उद्याचा सक्षम समाज घडणार आहे. परिस्थिती अभावी शिक्षण घेता आले नाही, ही खंत कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात राहून नये यासाठी त्यांच्या पाठिशी महिला उभ्या राहिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनलता पोखरणा यांनी विद्यार्थी सुरक्षितेविषयी उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्याताई बिडवे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे व परिसरातील स्वच्छतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी धावून आलेल्या ग्रुपच्या सर्व महिलांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेळासाठी नवीन गणवेश मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. इस्त्रो सहलीसाठी निवड झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार ग्रुपच्या वतीने करण्यात आला.
