घोडके परिवाराने मुलीचा वाढदिवस केला वस्तीगृहात साजरा
संघर्षातून उज्वल भवितव्य घडत असते -अभिषेक कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भीमा गौतमी वस्तीगृहातील मुलींसह घोडके परिवाराने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. कु. दीक्षा घोडके हिच्या वाढदिवसानिमित्त वस्तीगृहातील मुलींना अल्पोपहाराचे वाटप करुन विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, एम.एड. शिक्षक कृती समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता घोडके, इब्टा संघटनेचे अध्यक्ष आबा लोंढे, सुहास टिपसे, भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, गायकवाड सर, मनेष धजाल, वस्तीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अभिषेक कळमकर म्हणाले की, संघर्षातून उज्वल भवितव्य घडत असते. वस्तीगृहात राहून शिक्षणाद्वारे आपले भवितव्य घडविण्याचा संघर्षमय प्रवास या मुली करत आहे. स्पर्धामय युगात टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. वाचनातून ज्ञान व गुणवत्ता निर्माण होणार असून, मुलींना वाचन संस्कृती रुजविण्याचे त्यांनी आवाहन केले.

संगीता घोडके म्हणाल्या की, प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे. समाजाप्रती आपण देणे लागतो, असे समजून समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य करावे. तरच खऱ्या अर्थाने समाजकार्य घडून सशक्त समाजाची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता काळे यांनी प्रत्येकाने समाजातील वंचित घटकांसाठी योगदान देणे हे कर्तव्य आहे. विविध सण, राष्ट्रीय उत्सव, समाजसुधारकांची जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस व विवाहाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सागर चाबुकस्वार यांनी मुलींशी संवाद साधून मोठी स्वप्न पाहून ती साकारण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचे सांगितले.
