टीम 57 परिवाराने केली नाश्त्याची सोय
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत सहभागी मराठा समाजबांधवांना टीम 57 परिवाराच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
स्वप्निल पर्वते, सचिन काळभोर, प्रशांत काळभोर, ऋषी पर्वते, योगेश मोहाडीकर, किरण बगळे, जय धोंडे, नयन सोनीमंडलेचा, अमोल शिंदे, संदेश काळभोर, संदीप सपाटे, वैभव भोगाडे, सुशील शिंदे, बाळासाहेब बेरड, ओमकार पाटकर आदी उपस्थित होते.

या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून नागरिक शहरात सकाळपासूनच दाखल झाले होते. आलेल्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून टीम 57 च्या माध्यमातून नाश्त्याची सोय करण्यात आली होती.