• Wed. Nov 5th, 2025

गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बाल रुग्णांना भेटवस्तूंचे वाटप

ByMirror

Sep 11, 2024

स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटलचा उपक्रम

मुलांचे आरोग्य जपण्याबरोबरच त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा कौतुकास्पद उपक्रम -राकेश ओला

अहमदनगर (प्रतिनिधी)- बालिकाश्रम रोड, सावेडी येथील स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर सेंटर मध्ये गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या बाल रुग्णांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, युुवा उद्योजक विकी तिवारी, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. सचिन रक्ताटे, डॉ. किशोर कवाडे, स्वप्निल ढवण, प्रवीण राच्छा, प्रशांत शिंदे, संतोष अथर्गण, अक्षय बनकर, निखिल रुद्राक्ष, अरुण कुमार, डॉ. विष्णू गवते, डॉ. गौरव चव्हाण, डॉ. वैष्णवी वाळुंजकर, डॉ. सायली सुरोशी, डॉ. संजय पठाडे, डॉ. सागर दरेकर, डॉ. आयमनकौसर सय्यद, डॉ. अंजली आवारे, प्रतीक्षा गारुळे, अर्चना आठवले, आरती रणदिवे, प्रतीक्षा पारखे, प्रियंका पारखे, सुनंदा बिल्ला, स्वाती चुबे, रोहिणी पवार, रझिया शेख, रेखा गाडेकर, टीना नागपुरे, मिना बागुल, मार्था जगताप, रुपाली ससाणे, साक्षी सूर्यवंशी, परविन पठाण, सृष्टी आठवले, सायली चाबुकस्वार, कल्याणी गोड, नसरीन सय्यद, सविता चिल्का, शाहिस्ता अत्तार, सुनिता कांबळे, मयूर दळवी, प्रियांका धोंडे, सर्जेराव उल्हारे, चंदू मोरे, मिना ओहोळ, भारती मोरे आदी उपस्थित होते.


हॉस्पिटलच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सचिन वहाडणे म्हणाले की, बालकांशी प्रेमळ नाते जपण्याचे काम स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटल करत असल्याचे सांगून त्यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान बालकांच्या आरोग्यासाठी एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या दर्जेदार आरोग्यसेवेची माहिती दिली.


जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुलांचे आरोग्य जपण्याबरोबरच त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. आनंद लहामगे यांनी फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहे. लहान मुलांना निरोगी व सदृढ करण्यासाठी हॉस्पिटलची आरोग्य सेवा उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *