जॉगिंग पार्क मध्ये वृक्षारोपण
भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार यांचा वाढदिवस भिंगार शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये वृक्षारोपण करुन स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवन मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, कापड व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सचिन चोपडा, रमेश वराडे, जहीर सय्यद, युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, कार्याध्यक्ष अभिजीत सपकाळ, छावणी परिषदेचे सदस्य सुरेश मेहतानी, दीपकराव धाडगे, प्रांजली सपकाळ, जयश्री पोटे, उषाताई ठोकळ, संगीताताई दरवडे, मीनाषा शिंदे, आरतीताई बोराडे, संगीता सपकाळ, मनीषा गायकवाड, सुरेखाताई शेंडगे, रोहिणीताई तोडमल, वंदना पोटे, जाधव ताई, अशोक पराते, मनोहर दरवडे, दीपक बडदे, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, रतन मेहत्रे, दीपक मेहतानी, ईवान सपकाळ, नितीन घोडके, गणेश बारस्कर, दीपक घोडके आदी उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासून शहर व उपनगरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या जॉगिंग पार्कमध्ये सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी संजय सपकाळ यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे. तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. या उद्यानात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेले आरोग्य व पर्यावरण चळवळीचे कार्य प्रेरणादायी आहे. फक्त झाडे लावून न थांबता, ते जगविण्याचे कार्य या उद्यान परिसरात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता सामाजिक बांधिलकीने कार्य करत आहे. सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांची प्रश्न सोडविली जात आहे. भिंगार राष्ट्रवादीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ यांनी भविष्याचा विचार करुन सामाजिक चळवळ सुरु आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचा भविष्य असून, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सातत्याने उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीकोनाने हरदिनची चळवळ सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली. सचिन चोपडा म्हणाले की, भिंगार राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक प्रेरणेने विविध उपक्रम राबवित आहे. सामाजिक देणे लागते या भावनेने प्रत्येक सदस्य योगदान देत आहे. हरदिनच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीने व्यापक रुप धारण केले असून, सामाजिक संवेदना जपून कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य विजय पाखरे यांचा मुलगा प्रसाद विजय पाखरे याची ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या उपक्रमाबद्दल नीलोफर शेख यांनी आभार मानले. यावेळी बालभवनचे गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापुरकर, अंजूम शेख, अंबिका सदलापुरकर आदी उपस्थित होते.