रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मिळाला ब्लँकेटचा आधार
वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने सामाजिक उपक्रम -सर्वेश सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना भिंगार शहरातील गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत असताना, उघड्यावर झोपून जीवन जगत असलेल्यांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्वेश सपकाळ यांनी उपक्रम राबविला. तसेच व्यसनमुक्तीवर नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
भिंगारच्या भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सर्वेश सपकाळ, गंगाराम मुंढे, सुरेंद्रसिंह सोहेल (बिल्ला), सदाशिव नागपुरे, सचिन चोपडा, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, सुधीर कपाले, विकास भिंगारदिवे, प्रवीण परदेशी, बजरंग दरक, प्रांजली सपकाळ, शोभाताई मुंढे, सविता परदेशी, डॉ. अशोक चेंगेडे, रवींद्र बाकलीवाल, अनिल दुग्गड, विजय मालू, कैलास रासकर, राजू भिंगारे, प्रवीण मुनोत, डॉ. रवी दुवा, किरण फुलारी, राजू कांबळे, रामनाथ गर्जे, हरीश साळुंके, शेषराव पालवे, नामदेवराव जावळे, विश्वास (मुन्ना) वागस्कर, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, जालिंदर अळकुटे, योगेश चौधरी, सखाराम अळकुटे, भरत कनोजिया, अनिल हळगावकर, सुनील कसबे आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देत आहे. ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु असतात. वंचितांना आधार देण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात आत्मशक्ती व्यसनमुक्तीचे राहुल अडकर यांनी व्यसनाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत असताना युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी युवक-युवतींना विविध व्यसनाची फॅशन जीवावर बेतत असल्याचे सांगून त्याचे दुष्परिणाम सांगितले. तर व्यसनातून बाहेर पडून चांगल्या आरोग्यासाठी योग-प्राणायाम आणि व्यायामाचे आवाहन केले.
सर्वेश सपकाळ यांनी थंडीत वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने दरवर्षीप्रमाणे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. थंडीत उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू, निराधारांना ऊबदार ब्लँकेटची भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले होते.
