दिंडीच्या रिंगण सोहळ्यात रंगले मानवी मनोऱ्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक
नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या जे.एस.एस. गुरुकुलमध्ये शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जयघोषात, पारंपारिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत, हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उस्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडीचा मुख्य आकर्षण ठरलेला रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मानवी मनोरे उभारुन ग्रामस्थांचे मने जिंकली. दिंडीत विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या दिंडीची सुरुवात शाहूनगर येथील विठ्ठल-रक्मिणी मंदिरातून झाली. शाहूनगर चौक येथे बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. साई मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या भक्तीगीतावर फुगड्या खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. बालकांची दिंडी पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
जे.एस.एस. गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने सर्व सण-उत्सव साजरे केले जात असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांनी दिली. दिंडी यशस्वी करण्यासाठी अक्षय नायडू, निखिल बेदरे, हर्षा कार्ले, वासंती शेटीया, मीरा थोरात, अनुपमा तोडमल, वैशाली देशमुख, योगिता पाठक, पगारिया, शिफा शेख, आरती उरमुडे, पृथ्वी काटे, कांचन पगारिया, शितल भुजबळ, शुभांगी कार्ले, फिरदोस पठाण, बिना आरवडे, सायली सरोदे, योगिता कुकडे, शितल जाधव आदींसह शिक्षिका व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.