• Tue. Oct 28th, 2025

भ्रष्टाचारी सरकारी नोकरांविरोधात होणार ढब्बू मकात्या डिच्चू कावा गॅझेट प्रसिद्ध

ByMirror

May 23, 2024

लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार

जनतेच्या माध्यमातून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी नोकरीतून टेबलाखालून कमाई करणारे भ्रष्टाचारी व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाणीव नसलेल्यां विरोधात लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ढब्बू मकात्या डिच्चू कावा गॅझेट प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


यापुढे सरकारी नोकरीतून पगार, त्याशिवाय टेबलाखालून कमाई व मरेपर्यंत पेन्शन या गोष्टी काम न करता चालू शकणार नसल्याचे लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. लोकांबाबतची भक्ती, लोकांच्या प्रश्‍नांचे ज्ञान आणि ते सोडवण्याचे तंत्र त्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य सरकारी नोकरदारांना करावे लागणार असून, यासाठी जनतेच्या माध्यमातून दबावतंत्र निर्माण केले जाणार आहे.


सरकारी नोकरी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि मरेपर्यंत सरकारी नोकरीचा फायदा होतो, असा गैरसमज स्वातंत्र्योत्तर काळात 75 वर्ष टिकून राहिला. सरकारी नोकरी ही आपण देत असलेल्या सेवेबाबतचा मेहनताना मिळण्यासाठी आणि त्यातून कुटुंब चालविण्यासाठी कायद्याने निर्माण केलेली यंत्रणा आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी यामध्ये गुंतून पडले आहे. फुकटच्या मलिद्यावर बायका, मुलांना पोसण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे संस्कारहीन पिढी तयार झाली आणि सरकारी नोकर हे ढब्बू मकात्या वर्गातील लोक पोसले गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


भ्रष्टाचारातून आणलेल्या पैश्‍यातून मुलांना पोसणे व त्यांचे लाड पुरविणे हे आई-वडिलांचे संस्कार मुलांवर अतिशय वाईट होतात. वाईट संस्कारातून घडलेली पिढी वृद्धापकाळी आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रास्ता दाखवतात. सजीवांमध्ये असणाऱ्या चैतन्याचे अलिखित नियम हजारो वर्षे भारतीयांना माहित आहेत. त्याला साध्या भाषेत पाप आणि पुण्य असे म्हटले जाते. परंतु हरामाचा पैसा खाणारा कोणीही आजपर्यंत सुखी झालेला नसल्याचे म्हंटले आहे. भ्रष्टाचारी नोकरांविरोधात मोहिम यशस्वी करण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *