• Wed. Oct 15th, 2025

मुकुंदनगरच्या त्या ओपन स्पेसचे थांबलेले काम सुरु करा व दर्गा दायरा पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

ByMirror

Jan 2, 2025

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन

मुख्य रस्ता खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय व लहान-मोठ्या अपघातांचे वाढले प्रमाण

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 येथील सर्वे नंबर 338/1 मध्ये महापालिकेचे ओपन स्पेस विकसित करण्याचे थांबलेले काम पुन्हा सुरु करावे, वन विभागापासून ते दर्गा दायरा पर्यंतचा मुख्य रस्ता दुरुस्त करण्याची व पथदिवे बसविण्याची मागणी मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डांगे यांची भेट घेऊन सदर प्रश्‍नांचा पाढा वाचला.
याप्रसंगी हाजी खानसाहब उस्मानमियाँ, हाजी शेख रउफ, हाजी खान आलम, बशीर पठाण, हाजी शेख फकिर मोहम्मद, इस्माईल पठाण, हाजी शेख बिलाल, हाजी शेख अब्दुलकादीर, शेख अब्दुलरहिम (गोटु जहागीरदार), इब्राहिम पठाण, नवेद मिर्झा अंजुम, हबीब शेख, इकबाल सय्यद, ॲड. अनवर सय्यद, अब्दुल अजीज, गुलामदस्तगीर शेख, इस्माईल शेख, हाजी अब्दुल शेख सईद, आरिफ सय्यद नन्हेमियाँ, हाजी शरफोद्दीन शेख, हबीब पठाण, नुरमोहंमद सय्यद, ॲड. हाफिज जहागीरदार, ॲड. ताज सय्यद आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


महापालिका हद्दीतील मुकुंदनगरच्या सर्व्हे नं. 338/1 मध्ये ओपन स्पेसचे महापालिकेच्या माध्यमातून नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना सन 2023-24 अंतर्गत हर्षल अग्रवाल यांच्यामार्फत विकसीत करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सदर ठिकाणी सद्यस्थितीत काम थांबलेले असून, गेल्या दोन महिन्यापासून कामाच्या स्थितीत प्रगती नाही.
तसेच छत्रपती संभाजीनगर रोड येथील वन विभाग कार्यालयापासून ते दर्गा दायरापर्यंतचा मुकुंदनगर मधील मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर रस्ता रहदारीचा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला, मुलांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा लहान मोठे अपघात होत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय असलेल्या मेहराज मस्जिद जवळ पथदिवे नसल्याने संध्याकाळी या परिसरात अंधकार होत असून, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 येथील सर्वे नंबर 338/1 मध्ये महापालिकेचे ओपन स्पेस विकसित करण्याचे थांबलेले काम पुन्हा सुरु करावे, वन विभागापासून ते दर्गा दायरा पर्यंतचा मुख्य रस्ता दुरुस्त करण्याची व पथदिवे बसविण्याची मागणी मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *