• Sat. Sep 20th, 2025

महापालिकेतील सेवानिवृत्तांना दिवाळीपूर्वी थकीत देयके मिळण्याची मागणी

ByMirror

Oct 31, 2023

अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनचे आयुक्तांना निवेदन

दिवाळीपूर्वी पेन्शन व आठ महिन्याचा फरक देण्याचे आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी यांची थकीत देयके व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रकमा दिवाळीपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाचे मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व मुख्य लेखा अधिकारी धस यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.


यावेळी कास्ट्राईबचे राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे, कार्याध्यक्ष डी.यू. देशमुख, उपाध्यक्ष दिगंबर कोंडा, संघटक वसंत थोरात, सरचिटणीस रंगनाथ गावडे, डी.एन. टेपाळे, मुस्ताक कुरेशी, अनिस पठाण, रफिक शेख, मधुकर खताळ, शांता शेकटकर, सुशील शेलार, बोरगे आदींसह सेवानिवृत्त उपस्थित होते.


आयुक्त जावळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पेन्शन व आठ महिन्याचा फरक देऊन दिवाळी गोड करण्याचे आश्‍वासन दिले. तर मुख्य लेखा अधिकारी धस यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करुन 8 नोव्हेंबरपूर्वी कार्यवाही न झाल्यास महापालिके समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष पवळे यांनी दिला. महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी यांची थकीत देयके अदा करण्यात आलेली नाही. ती दिवाळीपूर्वी मिळाल्यास त्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


1 जुलै 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर एकूण आठ महिन्यांची महागाई वाढ फरक रक्कम अंदाजे 51 लाख रुपये, सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम व सहाव्या वेतन आयोगाची शक प्रमाणे थकबाकी रक्कम रुपये 75 लाख रुपये देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *