स्थानिक व्यावसायिकांचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार जगताप यांनी व्यावसायिक व नागरिकांच्या सोयीसाठी सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मारुती पवार यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश कदम, अविराज भांड, आनंद दळवी, आशिष शर्मा आदींसह व्यावसायिक उपस्थित होते.
भिंगार येथील पाण्याच्या टाकीजवळ मोठे व्यापारी संकुल असून, त्या भोवताली अनेक दुकाने आहेत. मात्र या परिसरात कच्चा रस्ता असल्याने पावसाने मोठ्या प्रमाणात चिखल होते. तसेच मोकळ्या जागेवर वाहने लावली जात आहे. तसेच रात्री या भागात पुरेश्याप्रमाणात उजेड नसल्याने नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. या परिसरात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात, या जागेत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. असल्याचे व्यावसायिकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नागरिक व व्यावसायिकांच्या सोयीसाठी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी आमदार जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.