• Fri. May 23rd, 2025

काकणेवाडीतील पतसंस्थेचे फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिट करण्याची मागणी

ByMirror

May 20, 2025

अनियमितता झाल्याचा अन्याय निवारण समितीचा आरोप; चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा

अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा आरोप करुन सन 2020 ते आज आखेर फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिट करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा लेखापरीक्षक वर्ग 1 व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देण्यात आले आहे. सहकार अधिनियमानुसार दोषी चेअरमन व संचालक मंडळात 21 दिवसात गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात या इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


पारनेर तालुक्यातील सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था काकणेवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात सहकार अधिनियमाची पायमल्ली करून अनियमित्ता केल्याने त्या संस्थेची तात्काळ फेरलेखा परीक्षण व वैधानिक तपासणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 कार्यालयाकडून 21 दिवसाच्या करण्यात यावे.


21 जून 2024 रोजी पी.एस. लांडगे प्रमाणित लेखापरीक्षक यांनी लेखापरीक्षण केलेल्या अहवालावरून पुढील बाबतीत अनियमित्ता झालेली आहे. सदर संस्थेच्या पोटीनियमातील कर्ज विषयक नियम 14 नुसार संस्थेने टाकून ठेवीच्या 10 टक्के तरलता म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेव म्हणून गुंतवणूक बंधनकारक असतानाही त्या नियमाची पायमल्ली केली आहे. पी.एस. लांडगे यांनी संस्थेतील अंतर्गत तपासणी व्यवस्था समाधानकारक नाही, असे नमूद केले आहे. संस्थेला येणे असलेली कर्ज तपासणी आणि त्याचे बुडीत आणि संशयित वर्गीकरण झालेले नाही. याबाबत संस्थेने कुठलीही तरतूद केलेली नाही. संस्थेने मागणी वसुली आणि बाकीचे नोंद वह्या योग्य रीतीने ठेवलेल्या नाहीत. विधी पोटनियमाची पायमल्ली करून कर्ज वाटप केलेले आहे. कर्ज प्रकरणात मुदत वाढीसाठी आवश्‍यक तेथे जमीनदारांच्या संमती पत्र घेतलेले नाही.
संस्थेची चलसंपत्ती आणि सांपत्तीक स्थिती दर्शवणारी विवरणपत्र योग्य प्राधिकाऱ्याकडे योग्य त्यावेळेस पाठवण्यात आलेले नाही. एनपीएच्या प्रमाणात वाढ करून मोठ्या प्रमाणात अनियमित करण्यात आली आहे. सीसी कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाली असून, कर्जावरील वसुल न झालेले व्याज उत्पादनात घेऊन नियमित बाह्य कामकाज करण्यात आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी या संस्थेने अनियमितता करून व्यवहाराची आर्थिक नुकसान करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात सहकार अधिनियम उपविधीची पायमल्ली या संस्थेने केली आहे. त्यामुळे सदरचे संस्थेचे फेरलेखापरीक्षण, वैधानिक तपासणी 2020 ते आज अखेर जिल्हा लेखा परीक्षक वर्ग 1 संस्था यांच्याकडून गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *