• Tue. Jul 1st, 2025

देहरेचे उपसरपंच डॉ. दीपक जाधव यांना पीएचडी प्रदान

ByMirror

Mar 29, 2025

गावातील राजकरण करताना भूगोल विषयातील अभ्यासात मिळवली डॉक्टरेट

नगर (प्रतिनिधी)- देहरे गावचे उपसरपंच डॉ. दीपक नाना जाधव यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने भूगोल विषयातील पीएचडी (विद्यावाचस्पती) ही पदवी बहाल करण्यात आली.
डॉ. दीपक जाधव यांनी इम्पॅक्ट ऑफ अग्रिकल्चरल चेंजेस ऑन द रुरल लँडस्केप ऑफ अहमदनगर (अहिल्यानगर) डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र (1991-2011) या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. त्यांना यासाठी आनंदराव धोंडे (अलियास बाबाजी महाविद्यालय, कडा ता. आष्टी) येथील डॉ.माधव राजपांगे यांचे मार्गदर्शन लाभले.


डॉ. दीपक जाधव हे सध्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्सीअल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. तसेच ते देहरे गावचे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रा.ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सेक्रेटरी ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, जेष्ठ विश्‍वस्त जी. डी. खानदेशे, सदस्य दीपक दरे, प्राचार्य विजय पोकळे, उपप्राचार्य दादासाहेब वांडेकर, पर्यवेक्षिका वैशाली दारकुंडे, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ पाटील सुलाखे, जिल्हाध्यक्ष सुनील चांदणे, शिवाजी लांडगे (मा. चेअरमन पतसंस्था), मा. सरपंच सुभाष खजिनदार, मा.जि.प. सदस्य बाबासाहेब गायकवाड, संजय शिंदे, अंबादास काळे, अरुण लांडगे, व्ही.डी. काळे, रमेश पाटील काळे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब काळे, रमेश काळे, बाळासाहेब निमसे, सरपंच कल्याणी धनवटे, ताराबाई करंडे, भानुदास भगत, नंदकुमार साळवे, राहुल जाधव, सुनिल बालवे, डॉ. अनिल लांडगे, संजय लांडगे, रघुनाथ जाधव, रोहीदास जाधव, विठ्ठल पठारे, नवनाथ जाधव, नवनाथ वाघमारे, डॉ. सुनिल जाधव, डॉ. नरेद्र वाव्हळ, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. रामदास टेकाळे, किशोर जाधव, बाळासाहेब बोरुडे, प्रा. किरण सोळसे, योगेश सोळसे, शिरीष टेकाडे यांनी अभिनंदन केले आहे.


डॉ. दिपक जाधव यांनी गावातील अनेक प्रश्‍नांवर आंदोलन करुन ते मार्गी लावली आहेत. भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास या चार विषयात त्यांनी एम.ए. पूर्ण केले असून, ते यापूर्वीच सेट व नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना मिळालेल्या पीएचडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *