यश ढवण ठरले मोपेड बाईकचे विजेते
भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी साड्यांचे बक्षीसे प्रदान; महिलांसाठी रंगला हळदी-कुंकूचा विशेष कार्यक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी धमाका ऑफर ठेवण्यात आली होती. या योजनेनिमित्त सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत काढण्यात आली. यामध्ये यश विलास ढवण मोपेड बाईकचे भाग्यवान विजेते ठरले. तर सोडत मधील 21 भाग्यवान विजेत्यांना पैठणी साड्या, सोन्याची नथ व आकर्षक भेटवस्तूंचे बक्षीसे देण्यात आले.
दिवाळी व पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दहा हजार रुपये पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या जमा झालेल्या कुपनची सोडत नुकतीच नवनागापूर येथील शाखेत काढून भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी नवनाथ दहिवाळ, सचिन दहिवाळ, नितीन दहिवाळ, अरुणा दहिवाळ, शितल दहिवाळ, पूजा दहिवाळ, साईराज दहिवाळ, स्वरा दहिवाळ, ओवी दहिवाळ, देवांश दहिवाळ, शंभू दहिवाळ आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सोडतीमध्ये पैठणीचे बक्षीस राणी वऱ्हाडे, मंदाकिनी घोरपडे, रामेश्वरी पवार, पल्लवी घाणे, प्रतीक्षा बोरुडे, अशोक घुगरकर, दीक्षा घाणे, शोभा बरबडे, अनुष्का मराठे, शोभा कराड, तसेच सोन्याच्या नथचे बक्षीस जिजाबाई दहिफळे, राधा रोडे, सचिन घुले, लता मराठे, प्रियंका भाकरे, उज्वला पेहेरे, पुष्पलता जाधव, अंजली, मंदाबाई खेरकड, सुमित केदार यांना मिळाले.यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम देखील रंगला होता. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या, यामधील विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाइन रोड (यशोदा नगर कमानी समोर), खरवंडी (ता. पाथर्डी) व धनकवडी (जि. पुणे) येथे चार शाखा कार्यरत आहे. या चारही शाखेमध्ये महिला दिन व विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. तसेच इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत. 1978 पासून शाखा कार्यरत असून, ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यात आला असल्याचे दहिवाळ बंधूंनी सांगितले आहे.
