सर्व ह्युंदाई कारची मोफत तपासणी; ग्राहकांच्या सुरक्षिततेचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ह्युदाई मोटर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील नगर-पुणे रोडवरील ईलाक्षी ह्युदाई व नगर- मनमाड रोड, सावेडी येथील ह्युंदाई प्रॉमिस शोरूम मध्ये रविवारी (दि.12 ऑक्टोबर) ह्युदाई ग्राहकांच्या वाहनांसाठी ऑल्वेज अराउंड कॅम्प उत्साहात पार पडले. या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कॅम्पचा शुभारंभ पोलिस निरीक्षक पोपटराव तोडमल याच्या हस्ते झाले. या कॅम्पमध्ये ग्राहकांना नवीन कार बघण्यास उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या कॅम्पमध्ये ह्युंदाई कारची मोफत तपासणी करून देण्यात आली. ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने आणि सेवा देण्यासाठी या कॅम्पचे दरवर्षी आयोजन केले जात असल्याची माहिती जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी दिली.