नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. संगमनेर येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी सुरु असलेल्या कार्याचा आढावा मांडला.
उत्तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मिडीया समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल सागर इरमल व क्रीडा विभाग शहर अध्यक्षपदी प्रविण गिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक आसिफ सुलतान, संगमनेर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पापडेजा, पाथर्डी काँग्रेसचे युवा नेते प्रकाश शेलार आदींसह युवकचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शहरात सुरु असलेल्या कार्याचे कौतुक व समाधान व्यक्त करुन, सर्व युवकांनी एकजुटीने ताकत उभी करण्याचे आवाहन केले. मोसिम शेख यांनी सर्व बहुजन समाजातील युवकांनी एकजुट करुन शहरात काँग्रेसची ताकत वाढविण्याचे कार्य सुरु आहे. युवकांनी पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढीचे कार्य सुरु केले असल्याचे सांगितले.
प्रवीण गीते पाटील यांनी शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंना येत असलेल्या समस्या मांडल्या. नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणालजी राऊत, काँग्रेसचे प्रदेश महासचिव हेमंत ओगले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष करण ससाणे, प्रशांत ओगले यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.