• Fri. Sep 19th, 2025

स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात रंगणार लहान मुलांची फॅन्सी ड्रेस व वैयक्तिक नृत्य स्पर्धा

ByMirror

Aug 11, 2024

तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात गुरुवारी (दि.15 ऑगस्ट) लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस व वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना फॅन्सी ड्रेसमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारायची आहे. तर देशभक्तीवरील गीतांवर नृत्याचे सादरीकरण करण्याचे विषय देण्यात आले आहे.


तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना व रक्तदान शिबिरात युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, कार्याध्यक्ष ओंकार पागावाड व खजिनदार महेश साठे यांनी केले आहे.


लालटाकी रोड, येथील रेसिडेन्शिअल शाळे समोर सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. फॅन्सी ड्रेस व वैयक्तिक नृत्य स्पर्धा ही स्पर्धा निशुल्क असून, वयवर्षे 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी असणार आहे. दोन्ही स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकासह दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्‍यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7972234373, 8668942384 व 9527848335 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *