• Sat. Mar 7th, 2026

नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

ByMirror

Mar 7, 2026

युवकांसह एमआयडीसीतील कामगारांचा मोठा सहभाग


आरती व जयघोषात परिसर दुमदुमला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनागापूर येथील गजानन कॉलनी परिसरात युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात नवनागापूर परिसरातील ग्रामस्थ, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एमआयडीसीमधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त नवनागापूर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


कार्यक्रमास युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, दत्ता पाटील सप्रे, आकाश कातोरे, उपसरपंच नरेश शेळके, बाबासाहेब डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील डोंगरे, दीपक गीते, लखन बैरागी, रंगनाथ गव्हाणे, सुभाष दांगट, संतोष गवारे, शंकर शेळके, विशाल चव्हाण, अक्षय पिसे, कल्याण जाधव, स्वप्निल भरड, सुनिल शेवाळे, अरबाज खान, गौरव पाटोळे, अमोल घुटे, गोरव पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गव्हाणे, स्वप्निल खराडे, वसीम शेख, संतोष शेवाळे, अभिजित सांबारे, प्रदीप दहातोंडे, अजिनाथ शिरसाट, जितेंद्र तळेकर, शशीकांत संसारे, राहुल जगधने, राजेंद्र पारखे, नामदेव झेंडे, किसन तरटे, सचिन खेसे, संजय बागल, शिवाजी चौरे, शत्रुघ्न तांबे, अनिल गायकवाड, रामनाथ घुगे, प्रविण सोनवणे, सिद्धीनाथ पोकळे, अनिल शिरसाठ, भरत दिंडे, राहुल मेहेरखांब, गोरक्षनाथ खंडागळे, वैष्णव गलांडे, शिव गलांडे, अविनाश कर्डिले, नितीन खेसे, तुषार शेवाळे, निलेश शेवाळे, विष्णु घुगे, रामदास खरात, पवन क्षीरसागर, सागर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्‍यक आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना सर्व समाजघटकांना न्याय देणारे आदर्श राज्य उभारले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नवनागापूरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी नवनागापूर येथे भव्य शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांनी सांगितले की, दरवर्षी युवा सेना आणि एमआयडीसीमधील कामगारांच्या सहभागातून नवनागापूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्य, धैर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर अशक्य वाटणारे स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यांनी स्वराज्यातील सर्व प्रजेला समान न्याय देत आदर्श प्रशासन उभे केले. आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी काम केले पाहिजे. देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवेची भावना जपणे हीच शिवरायांना खरी अभिवादन ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *